Geminids - 2010
Written by Khagol Mandal News   
Monday, 13 December 2010 09:55

 

Geminids is one of the best and reliable meteor showers to observe. The shower is probably the debris from the asteroid 3200 Phaethon. In India, the shower can be observed in the early morning skies of December 14 and 15. Location of the radiant and other details are given below. Radiant will rise at about 8 pm in the evening and culminate at about 3 am. (Moon will set before 01.30 am, thereby freeing the early morning skies for meteor observations.)

Details:

 

Active: December 7–17;

 

Maximum: December 14, 11h UT (λo = 262 .°2);

 

ZHR = 120;

 

Radiant: α = 112°, δ = +33°;

 

V∞ = 35 km/s;

r = 2.6

Geminids-2010

Last Updated on Wednesday, 15 December 2010 17:58
 
Sky in October
Monday, 18 October 2010 13:54
{mosimage} 
हार्टले-२ धूमकेतू हा या महिन्याच्या आकाशाचे मुख्य आकर्षण असणार आहे. दीर्घवर्तुळाकार कक्षा असलेल्या या धूमकेतूचा भ्रमणकाळ ६ वर्षे आहे. जरी धूमकेतूची सध्याची प्रत ६ असली, तरी त्याचे निरीक्षण करणे वाटते तितके सोपे असणार नाही; कारण धूमकेतूचा आकार मोठा असल्याने ही तेजस्विता मोठ्या क्षेत्रफळावर विभागली गेली आहे.
२० ऑक्टोबर रोज़ी हा धूमकेतू पृथ्वीच्या सर्वात जवळ (फक्त ०.१ खगोलीय एकक) असेल. यादिवशी तो ब्रम्हहृदय ता-याच्या जवळ दिसेल. धूमकेतू उपसूर्य बिंदू स्थानी २८ ऑक्टोबर रोज़ी जाईल. पौर्णिमा नुकतीच उलटून गेलेला चंद्र आकाशात असल्यामुळे २८ ऑक्टोबरला धूमकेतूचे निरीक्षण करणे कठीण जाईल.
धूमकेतूचे निरीक्षण करण्यासाठी शहरापासून थोडी दूर असलेली जागा निवडणे आवश्यक आहे. तसेच, जास्त वर्धनशीलतेच्या दूर्बिणी ऐवजी द्विनेत्री सारखे जास्त दृश्यक्षेत्र असणारे उपकरण सोईस्कर ठरेल.

सूर्य : शरद्संपात बिंदू पार केल्यानंतर या महिन्याच्या पूर्वार्धात सूर्योदय साधारण पहाटे ६:३०ला होईल आणि सूर्यास्त त्यापासून साधारण १२ तासांनी होईल. महिन्याच्या पूर्वार्धात सूर्य कन्या राशी मधे राहील. महिन्याच्या उत्तरार्धात सूर्योदय त्याच स्थानिक वेळेवर होईल, तर सूर्यास्त त्यानंतर साडे-अकरा तासांनी म्हणजे संध्याकाळी सुमारे ६:०५ ला होईल. महिन्याच्या शेवटच्या काही दिवसात सूर्य आंतरराष्ट्रीय खगोलीय समितीने निश्चित केलेल्या तुळ राशीच्या सीमेला पार करेल.

बुध : या महिन्याभरात बुध ग्रह सूर्यतेजात लुप्त झाल्यामुळे दिसू शकणार नाही.

शुक्र : २९-ऑक्टोबरला होणार्‍याआंतरिक युतिकडे वाटचाल करणार्‍या शुक्राची सध्या सुंदर कोर  महिनाभर पाहावयास मिळेल. महिन्याच्या पूर्वार्धात ११% प्रकाशित भाग दिसणार्‍या शुक्राची कला केवळ १% प्रकाशित भाग दिसेपर्यंत हळू हळू कमी होत जाईल.

मंगळ : सूर्यातेजापासून फार लांब नसलेल्या मंगळाचे सूर्यास्तानंतर पश्चिम क्षितिजापासून थोड्या उंचीवर निरीक्षण करता येईल. मंगळ सूर्यसापेक्ष पृथ्वीच्या विरुद्ध बाजूस असल्यामुळे त्याच्या बिंबाचा आकार अतिशय छोटा (४ आर्क-सेकंद) दिसेल. मोठया दूर्बिणी मधूनही ग्रहावरची फारशी वैशिष्ट्ये दिसणार नाहीत.

गुरू : -२.९ प्रतीने झळाळणारा गुरू प्रतीयुतीच्या नंतरच्या या महिन्यातही जवळपास रात्रभर बघता येईल. ४९ आर्क-मिनिटाच्या गुरूच्या बिंबावरच्या विविध वैशिष्ट्यांचे निरीक्षण करण्यासाठी हा महिना उत्तम ठरेल. गुरुबिंबावर दिसणारा उपग्रहांचा अधिक्रमण आणि सावल्यांचा खेळ साध्या ४" दूर्बिणीमधूनही छान दिसू शकेल.

शनी : सूर्य आणि शनी सध्या कन्याराशीत असल्यामुळे शनीचे या महिन्यामध्ये निरीक्षण करता येणार नाही.

युरेनस : युरेनस सध्या गुरुपासून केवळ तीन-सव्वातीन अंशावर दिसेल. ज्यांनी याआधी युरेनस पहिला नसेल त्यांच्यासाठी +५.७ प्रतीच्या हिरवट बिंबाचे निरीक्षण करण्यासाठी ही उत्तम संधी आहे.

नेपच्यून : मकर राशीसारख्या फारसे तेजस्वी तारे नसलेल्या पार्श्वभूमीवर दिसणारा नेपच्यून शोधण्यासाठी चांगल्या फाइंडर नकाशाची आणि जास्त वर्धनशीलतेच्या दूर्बिणीची आवश्यकता भासेल.

खुजे-ग्रह : सेरेस आणि प्लूटो हे दोन्ही खुजे-ग्रह धनू राशी मध्ये अनुक्रमे ८.२ आणि १४.२ प्रतीला दिसू शकतील.
Last Updated on Monday, 18 October 2010 14:09
 
Mangalatai Abhyankar Memorial Lecture
Monday, 27 September 2010 09:44

खगोल मंडळाचे "श्रीमती मंगलाताई अभ्यंकर संस्मरण"  ह्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानाचे हे तिसरे रे वर्ष. या वर्षी डॉ. अनिकेत सुळे यांचे व्याख्यान शनिवार दिनांक २ ऑक्टोंबर २०१० रोजी साधना विद्यालय येथे सांयकाळी ५ ते ७ या कालावधीत झाले.

"भारताची अंतराळ विज्ञानातील प्रगती आणि खगोलशास्रातील संधी"  ह्या विषयावर व्यख्यान झाले. हा विषय डॉ अनिकेत सुळे यांनी अतिशय सोप्या, कोणासही समजेल व उमजेल अश्या पध्दतीने मांडला. संगणकीय चित्रांच्या माध्यमातुन भारताच्या अंतराळ संशोधनातील टप्पे, त्याची गरज, महत्व, सर्वसामान्यांना होणारे फायदे यांची उकल त्यांनी केली.
खगोलशास्त्र या विषयाचा प्रचार आणि प्रसार करताना जनमानसातुन नेहमी एक प्रश्न विचारला जातो.  आपल्या देशातील ब~याच लोकांना दोन वेळेंच्या अन्नाची ददात असताना आपण चांद्रयान पाठवणे योग्य का? 

या व्याख्यानात यांचे आकडेवारीसह त्यास योग्य उत्तर डॉ. अनिकेत सुळे यांनी दिले. सुरुवातीलाच अंतराळयान का पाठवायचे, कसे पाठवायचे, येणा~या अडचणी यांचे विश्लेषण केले. आपल्या आयुष्यातील कितीतरी गोष्टीं या अंतराळ विज्ञानातील प्रगतीशी निगडीत असतात यांचा विसर रोजच्या धकाधकीत सर्वसामन्यांना पडलेला असतो. भारत हा आजही शेतीप्रदान देश असुन जमिनींच्या सर्वकक्षणांपासुन, भुजल पातळी, हवामानशास्र ते दुरदर्श्नवर दिसणा~या जगभरातील   विविध घडामोडी या अंतराळ विज्ञानामुळेचे सर्वस्वी शक्य आहेत. आपण भारताने त्यात स्वंय-पुर्णता मिळविणे हे प्रत्येक भारतीयास स्वाभिमानास्पदच आहे. आज अंतराळ विज्ञानासाठी खर्च होणा~या प्रत्येक १ रुपया मागे त्यास परतावा म्ह्णणुन २ रुपये भारतास मिळत आहेत. 

खगोलशास्त्रातील संधी यावर त्यांनी आजच्या पालकांची व विद्यार्थांची मानसिकता व यातील उपलब्ध संधी याचे विस्तुत विवेचन केले. उपस्थित पालक व विद्यार्थी यांनी विचारलेल्या प्रश्नांचे निरसन केले.  

{mosimage} 

Last Updated on Saturday, 02 October 2010 16:25
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 5 of 11