२१ जून २०२० रोजी सूर्य सर्वाधिक उत्तरेला कर्क वृत्तावर २३.५ उत्तर येथे आलेला असेल. या स्थानाला विष्ठंभ (Summer Solstice) असे म्हणतात. यानंतर दक्षिणायनला सुरुवात होते. हा दिवस उत्तर गोलार्धासाठी सर्वात मोठा दिवस असतो.
या वर्षी, याच दिवशी अमावस्या असून कंकणाकृती सूर्यग्रहण देखील आहे. राजस्थान-पंजाब -हरियाणा-उत्तरांचल या राज्यातून बांगडीसारखा सूर्य दिसणार आहे. ग्रहणाचा सर्वोच्च बिंदु जोशीमठ या ठिकाणी आहे. या ग्रहणाचे महत्वाचे वैशिष्ट्य असे की परमोच्च काली सूर्य ९८% झाकले जाणार आहे. त्यामुळे अत्यंत बारीक सौरकडे दिसणार आहे. त्यामुळेच, ही स्थिति जास्तीत जास्त ३० सेकंद असेल.
ग्रहण नकाशा व इतर माहिती पुढीलप्रमाणे आहे.
ग्रहण विविध माहिती:
महाराष्ट्रातील महत्वाच्या शहरात खंडग्रास ग्रहण दिसेल व वेळ पुढील प्रमाणे आहे.